Header Ads

अल्प संख्याक विद्यार्थीवर अन्याय शिक्षक असुनही उर्दू शाळा ओस रिपब्लिकन सेना आंदोलनाचा इशारा.

 अल्प संख्याक विद्यार्थीवर अन्याय शिक्षक असुनही उर्दू शाळा ओस रिपब्लिकन सेना आंदोलनाचा इशारा.

-----------------------------------

दि ७-९-२०२६

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- कोल्हापूर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क डावलले जात असल्याचा आरोप रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष मा. भिमराव आनंदा गोंधळी यांनी केला आहे.या संदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या एकूण १२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, अनेक शाळांमध्ये कित्येक महिन्यांपासून शिक्षकच नाहीत. तर दुसरीकडे जिल्ह्यातच १२ शिक्षक अतिरिक्त म्हणून शासनाच्या यादीवर आहेत. शिक्षक उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय समायोजन न झाल्याने शाळा ओस पडल्या आहेत. एका शिक्षकावर २ ते ३ वर्गांची जबाबदारी दिल्याने गुणवत्तेवर परिणाम होत आहे. हा प्रश्न गेल्या ४ महिन्यांपासून प्रलंबित आहे, हा गरीब व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ आहे.

जेव्हा १२ पदे रिक्त आणि १२ शिक्षक अतिरिक्त आहेत, तेव्हा समायोजनास विलंब करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः दखल घेऊन शिक्षण विभागाची बैठक घ्यावी, तालुक्याची अट बाजूला ठेवून जिल्ह्याचा एक युनिट म्हणून रिक्त १२ पदांवर १२ अतिरिक्त शिक्षकांचे पारदर्शक समायोजन करावे आणि ही कार्यवाही ७ दिवसांत पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

७ दिवसांत निर्णय न झाल्यास रिपब्लिकन सेना करवीर तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा रिपब्लिकन सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे


निवेदन स्वीकारताना डॉ जॅसमिन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर 

निवेदन देताना मा.सागर कुरडे  जिल्हा महासचिव, अमोल कांबळे युवा जिल्हा अध्यक्ष, भिमराव गोंधळी रिपब्लिकन सेना करवीर अध्यक्ष, प्रवीण आजरेकर कोल्हापूर शहर विनोद कांबळे जिल्हा उपाध्यक्ष,शिवाजी कांबळे करवीर संघटक, संदिप गोंधळी करवीर कोषाध्यक्ष, रसिका चौगुले महिला आघाडी अध्यक्षा, उपस्थित होते ..

No comments:

Powered by Blogger.