महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय अमरावतीत धरणे आंदोलन.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचा पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय अमरावतीत धरणे आंदोलन.
अमरावती प्रतिनिधी
पी एन देशमुख.
-------------------------------
, : पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने बुधवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यासह सर्व तालुक्यांतील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पत्रकार एकजुटीची ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकारांना घरकुल उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासाठी पत्रकार भवन उपलब्ध करून देणे, पत्रकारितेत पोलिसांचा वाढता हस्तक्षेप थांबविणे, तसेच पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्याच्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
याशिवाय वलगाव येथील पत्रकाराच्या दिव्यांग मुलावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्याय मिळावा, तसेच अर्धवट हटविण्यात आलेले अतिक्रमण पूर्णपणे हटवून संबंधित जागा दिव्यांग वाहन पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून महिला पत्रकारासोबत झालेल्या दबंगाईचा निषेध आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. पत्रकारांशी संबंधित इतर विविध प्रश्नही यावेळी प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी पक्ष, विचार आणि माध्यमांचे मतभेद बाजूला ठेवून बुधवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तसेच पत्रकारांच्या समस्या बाबत नयन मोंढे
विदर्भ प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,प्रविण शेगोकार
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,विनोद इंगळे
जिल्हा संघटक, महाराष्ट्र राज्य पत्रकार, नितीन भाऊ मुळे ज्येष्ठ पत्रकार, अर्चना राक्षे, सोमेश्वर जेवढे, उल्हास अडसळ, पी एन. देशमुख. (दैनिक कलमवीर जिल्हा प्रतिनिधी) अरुण वानखडे तथागत टीव्ही चॅनल संचालक. जयकुमार बुटे पत्रकारसह अनेक पत्रकार गण धरणे आंदोलनात उपस्थित होते.


No comments: