Header Ads

अश्लील नृत्य करणाऱ्या महिला आणणाऱ्या गणेश मंडळांवर कडक कारवाई; राधानगरी पोलिसांचा इशारा

अश्लील नृत्य करणाऱ्या महिला आणणाऱ्या गणेश मंडळांवर कडक कारवाई; राधानगरी पोलिसांचा इशारा.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलिसांनी गणेश मंडळांना स्पष्ट इशारा दिला आहे. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या महिला आणणाऱ्या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक अजित सिंध यांनी दिला.

राधानगरी पोलीस ठाण्यात तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत त्यांनी सांगितले की, मिरवणुकीत मद्य किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन करून गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवरही कडक कारवाई केली जाईल. तसेच गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि साऊंड सिस्टिमसाठी शासनाने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे.

याशिवाय मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर बंदी असल्याचे स्पष्ट करत सर्व मंडळांनी नियमांचे पालन करून शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अजित सिंध यांनी केले.

बैठकीला राधानगरी, दुर्गमानवड, पिरळ, आपटाळ, कारिवडे, फेजीवडे, तळगाव, रामनवाडी, सोन्याची शिरोली, पडळी आदी गावांतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.