रातोरात वन्यडुकरांचा धुमाकूळ!; भुईमूगाचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त, परळीतील शेतकरी हवालदिल
रातोरात वन्यडुकरांचा धुमाकूळ!; भुईमूगाचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त, परळीतील शेतकरी हवालदिल.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
परळी परिसरात वन्यडुकरांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या भुईमूग पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. रातोरात शेतात घुसलेल्या वन्यडुकरांनी उभे पीक तुडवून टाकले, तर अनेक ठिकाणी भुईमूग उकरून फस्त केल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कष्टाने आणि मोठा खर्च करून उभे केलेले भुईमूग पीक काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यडुकरांचा वाढता उपद्रव आता गंभीर समस्या बनत चालल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या नियमानुसार त्वरित नुकसानभरपाई द्यावी, तसेच वन्यडुकरांचा बंदोबस्त करून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा इशारा: "वन्यडुकरांचा उपद्रव रोखला नाही, तर आगामी हंगामातील पिके वाचवणे कठीण होईल."

No comments: