Header Ads

चांदेकरवाडीत स्मार्ट मीटरवरून हायव्होल्टेज राडा!; ग्रामस्थांचा संताप, झटापटीनंतर चौघांवर गुन्हा

 चांदेकरवाडीत स्मार्ट मीटरवरून हायव्होल्टेज राडा!; ग्रामस्थांचा संताप, झटापटीनंतर चौघांवर गुन्हा.


फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र | राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.

राधानगरी : राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे स्मार्ट मीटर बसविण्यावरून रविवारी मोठा हायव्होल्टेज संघर्ष उफाळून आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू करताच संतप्त ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत काम रोखले. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद विकोपाला जाऊन धक्काबुक्कीची घटना घडल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ग्रामस्थांनी "स्मार्ट मीटर नकोच!" अशी ठाम भूमिका घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम थांबवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोंधळात झटापटीचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला.

या घटनेनंतर संबंधित वायरमनने राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सागर शंकर खोत, सातापा शंकर धनवडे, पांडुरंग तानाजी खोत आणि दीपक बाबुराव खोत यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

गावात स्मार्ट मीटरच्या विरोधाचा मुद्दा आता अधिकच तापला असून, महावितरण आणि ग्रामस्थ आमनेसामने आल्याने हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. चांदेकरवाडीतील हा "स्मार्ट मीटरचा शॉक" पुढे कोणते नवे वळण घेणार, याकडे संपूर्ण राधानगरी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.