Header Ads

मोरगावजवळ भीषण अपघाताचा थरार! दुचाकीवरील दोघे गंभीर; एक किरकोळ जखमी, तिघेही मिरज सिव्हिलमध्ये दाखल..

 मोरगावजवळ भीषण अपघाताचा थरार! दुचाकीवरील दोघे गंभीर; एक किरकोळ जखमी, तिघेही मिरज सिव्हिलमध्ये दाखल.


कवठेमहांकाळ | प्रतिनिधी : राजू कदम

कवठेमहांकाळ तालुक्यातील मोरगाव हद्दीत अग्रणी नदीच्या पुलाच्या पुढे आज सायंकाळी सुमारे ६ वाजून २१ मिनिटांनी भीषण रस्ता अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून, आणखी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी MH 51 H 5904 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली.

सर्व जखमींना पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातातील जखमी युवक जयसिंगपूर तालुक्यातील दानोळी आणि कोथळी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.