Header Ads

गणेशोत्सवात राधानगरी पोलिसांचा मोठा निर्णय! ४५ जणांना तालुक्यात प्रवेशबंदी.

 गणेशोत्सवात राधानगरी पोलिसांचा मोठा निर्णय! ४५ जणांना तालुक्यात प्रवेशबंदी.

--------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

--------------------------------------

गणेशोत्सव शांततामय, भयमुक्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी राधानगरी पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार, यापूर्वी गणेशोत्सव काळात गुन्हे दाखल झालेले तसेच शांतता भंगाची शक्यता असलेल्या ४५ व्यक्तींना २६ सप्टेंबरपर्यंत राधानगरी तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

राधानगरी पोलीस ठाण्याने संबंधित व्यक्तींविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी (राधानगरी-कागल) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार प्रवेशबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

प्रवेशबंदी करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मासुली (सावताचीवाडी) येथील २२, तळाशी ९, राशिवडे ४, धामोड १, कसबा वाळवे १, मानेवाडी १, गुडाळ १, चंद्रे १, केळोशी १ आणि काळमवाडी १ अशा विविध गावांतील व्यक्तींचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी गणेशोत्सव हा भक्ती आणि आनंदाचा उत्सव असून सर्व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.