Header Ads

दानोळीत 'नंदिवाले चषक २०२६' चा थरार; 'बालाजी स्पोर्ट्स कोपार्डे संघ विजेता!

 दानोळीत 'नंदिवाले चषक २०२६' चा थरार; 'बालाजी स्पोर्ट्स कोपार्डे संघ विजेता!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गांधीनगर/प्रतिनिधी उदय साळुंखे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दानोळी:

व्यंकोबा गणेश मंडळ दानोळीच्या वतीने आयोजित 'नंदिवाले चषक २०२६' ही भव्य हाफ-पिच क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या मानाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत 'बालाजी स्पोर्ट्स कोपर्ड' संघाने विजेतेपद पटकावले.




मंगोबा देवालय माळ चांदोली येथे पार पडलेल्या या स्पर्धेला अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक सुनील होगले तर चषक बाजीराव नंदिवाले यांनी प्रायोजित केले होते. द्वितीय क्रमांकासाठी उदय दादा राऊत यांचे रोख सहकार्य तर तुषार नंदिवाले यांचा चषक होता. तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व्यंकोबा गणेश मंडळ तर चषक श्रावण गावडे यांनी दिला. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस शुभम मलमे आणि वैभव राऊत यांच्या संयुक्त विद्यमाने तर चषक मानाजी नंदिवाले यांनी प्रायोजित केला होता.

अंतिम सामन्यातील चुरशीच्या लढतीनंतर बालाजी स्पोर्ट्स कोपर्डेने बाजी मारत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल व्यंकोबा गणेश मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.