रेंदाळचे सुपुत्र सुभाष पुजारी यांची पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती!
रेंदाळचे सुपुत्र सुभाष पुजारी यांची पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती! कर्तृत्वाची दमदार वाटचाल; रेंदाळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.
रेंदाळ | प्रतिनिधी :
सचिन कुंभार.
~~~~~~~~~~~~~~
रेंदाळचे सुपुत्र तथा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सुभाष पुजारी यांची पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या. यामध्ये पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदाची महत्त्वाची जबाबदारी सुभाष पुजारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी पनवेल व परिसरातील वाहतूक व्यवस्था, पनवेल तालुका पोलीस ठाणे, गुन्हे शाखा तसेच मुंबई-पुणे वाहतूक शाखा आदी ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच अनधिकृत रिक्षा पार्किंग यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी यापूर्वीही प्रभावी काम केले आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी
पोलीस सेवेसोबतच शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रातही सुभाष पुजारी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. ‘मिस्टर वर्ल्ड’ स्पर्धेत सहा वेळा, ‘मिस्टर एशिया’ स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवली आहेत.पोलीस सेवा आणि क्रीडा क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सुभाष पुजारी यांची ही नियुक्ती रेंदाळ गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

No comments: