मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई; चोरीतील आरोपी अटक, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई; चोरीतील आरोपी अटक, १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
मिरज | प्रतिनिधी : राजू कदम.
-----------------------------------
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत जग्या कलियुग भोसले (वय २१, रा. बडडी, ता. मिरज) याला अटक केली. आरोपीकडून १७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २५ ते २६ जुलै २०२६ दरम्यान बडडी येथे अर्जुन तानाजी पवार व इतर तिघांचे मोबाईल, रोख रक्कम आणि विहिरीवरील केबल असा एकूण ३७,५०० रुपयांचा माल चोरीला गेला होता. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडून १० हजार रुपये रोख तसेच नोकिया, ओप्पो आणि व्हिवो कंपनीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने केली.

No comments: