सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न.
सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न.
------------------------------------
मलकापूर प्रतिनिधी
रोहित पास्ते
------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथे भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील पात्र नागरिकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले श्रावण बाळ या योजनेचे वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविणे नागरिकांना सुलभ झाले आहे.
या अभियानांतर्गत सरूड येथे आयोजित कार्यक्रमास शाहूवाडीच्या तहसीलदार शुभांगी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सरूड मंडलाधिकारी विकास जाधव, तलाठी गणेश शिंदे, सरपंच भगवान नांगरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील अनेक नागरिकांकडे जातीचे व उत्पन्नाचे दाखले उपलब्ध नसल्याने विविध शासकीय योजना, सुविधा व सवलतींचा लाभ घेण्यास अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पात्र नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यात आले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना ही पीक पाणी साठी तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले
यावेळी भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील ज्या नागरिकांना अद्याप जातीचे अथवा उत्पन्नाचे दाखले मिळालेले नाहीत, त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि आपले दाखले तातडीने मिळवून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
या अभियानामुळे सरूड परिसरातील वंचित घटकांतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यास मदत होत असून, प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

No comments: