Header Ads

गवशी मधील लेझीम मंडळाचा दिल्लीमध्ये अविष्कार.

 गवशी मधील लेझीम मंडळाचा दिल्लीमध्ये अविष्कार.

----------------------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

९५९५३१६२६६

 ----------------------------------

गवशी (ता. राधानगरी) येथील प्रसिद्ध भैरवनाथ लेझीम मंडळ गणेश उत्सवाच्या कार्यक्रमासाठी २३ सप्टेंबरला दिल्लीला रवाना झाले .

दिल्ली येथील दि शिवाजी मराठा तरुण मंडळाने फेसबुकवर भैरवनाथ लेझीम पथकाचा कार्यक्रम पाहिला होता. कार्यक्रम आवडल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मोबाईलवर संपर्क साधून पथकाला दिल्ली येथे गणेशोत्सवासाठी आमंत्रित केले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.


भैरवनाथ लेझीम मंडळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील नावाजलेले पथक आहे. या पथकाने आजवर विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तब्बल ७५ शिल्ड मिळवले आहेत. परशुराम पाटील ,राजकुमार पाटील, मोहन पाटील ओमकार पाटील रोहित पाटील, कृष्णात केसरकर, शरद पाटील पृथ्वीराज पाटील, शिवाजी इंजूळकर, गणेश पाटील, संदीप पाटील, मारुती नाईक, सुदेश केसरकर इतर २९जण लेझीम पथकामध्ये भाग घेणार आहेत.

No comments:

Powered by Blogger.