धक्कादायक! परळीकरांच्या नळातून गढूळ पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर "हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का?" — परळीकरांचा संतप्त सवाल
धक्कादायक! परळीकरांच्या नळातून गढूळ पाणी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
"हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का?" — परळीकरांचा संतप्त सवाल.
परळी | प्रतिनिधी : अमर इंदलकर
परळी गावात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या नळांना अशुद्ध, गढूळ आणि मळकट पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नळातून येणाऱ्या पाण्याचा रंग आणि गुणवत्ता पाहून अनेकांनी "हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का?" असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
पाणी हा प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असताना अशा प्रकारचा अशुद्ध पाणीपुरवठा सुरू असल्याने आरोग्याचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार व इतर जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच पाणीपुरवठा यंत्रणेत नेमका बिघाड कुठे आहे, याची चौकशी करून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने या समस्येबाबत स्पष्ट भूमिका घेत शुद्ध पाणीपुरवठा कधीपासून सुरळीत होणार, याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

No comments: