Header Ads

पिंपरी पूर्णा येथे युवकांनी केली पूर्णा नदीची स्वच्छता.

 पिंपरी पूर्णा येथे युवकांनी केली पूर्णा नदीची स्वच्छता.


---------------------------------

मयुर खापरे

---------------------------------

पिंपरी पूर्णा : गणेशोत्सवानंतर पूर्णा नदीपात्रात जमा झालेला कचरा हटविण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले. यावेळी नदीपात्रातील प्लास्टिक पिशव्या, हार-फुले, नारळ, पालापाचोळा व इतर कचरा बाहेर काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आले.


‘स्वच्छ नदी, सुंदर गाव’ हा संदेश देत युवकांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक बांधिलकी जपली.


*या अभियानात मंगेश घुसे, विशाल आवारे, तृशांत कुरवाडे, स्वप्नील ढोणे, अंकुश काशीकर, दिशांक काशीकर, धीरज कुरवाडे, अनुराग सोनारे, प्रज्वल काशीकर, राहुल आवारे, यश कुरवाडे व जय बोहरूपी यांनी सहभाग घेतला.*

No comments:

Powered by Blogger.