Header Ads

अलीकडील काळात नागरिकांची बदलती जीवनशैली तान तणाव मुळे आरोग्य समस्या वाढतात. डॉक्टर दिपाली पाटील.

 अलीकडील काळात नागरिकांची बदलती जीवनशैली तान तणाव मुळे आरोग्य समस्या वाढतात. डॉक्टर दिपाली पाटील.

-------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------

 अलीकडील काळात नागरिकांची बदलती जीवनशैली आणि ताणतणावामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून वयाच्या तिशी नंतर नियमित आरोग्य तपासणी गरजेची आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली पाटील यांनी केले.

गुडाळ ता. राधानगरी येथे जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने 'माझं गाव- आरोग्य संपन्न गाव' योजने अंतर्गत रुग्ण तपासणी आणि औषधोपचार शिबिरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

 राधानगरी तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने 'तिशीचा पल्ला - तपासणी आणि सल्ला' हे अभियान सुरू आहे. या अंतर्गत गुडाळ येथील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची ऑनलाईन आभा कार्ड, गोल्डन कार्ड आणि वयोवंदना कार्ड काढण्यात आली. यावेळी 300 हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र शेटे आणि डॉ. ओंकार चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. दिपाली पाटील, श्रीकांत चौगले,गोदावरी लटपटे,अर्चना मोहिते, अंजना पाटील आदिंसह गुडाळ आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका नी परिश्रम घेतले.

No comments:

Powered by Blogger.