Header Ads

तरुणांनी नोकरीपेक्षा व्यावसायिक बनावे : देशमुख.

 तरुणांनी नोकरीपेक्षा व्यावसायिक बनावे : देशमुख.

----------------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

 जोतीराम कुंभार

----------------------------------

अलिकडे बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे.नोकरी नसल्याने लग्न न होण्याची समस्या गंभीर बनली आहे.तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतः चे उद्योग व्यवसाय सुरु करु करावेत.लोकमंगल परिवार उद्योजक बनवण्यासाठी तयार आहे.नवे उद्योजक बनवण्यासाठी साथ द्या.असे आवाहन लोकमंगल चे रोहन देशमुख यांनी केले.

ते मुरगूड येथे लोकमंगल मल्टीस्टेट को आँफ सोसायटी मुरगूड शाखेच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

विठ्ठल ढेकळे म्हणाले,सुभाष देशमुख यांनी सामाजिक बांधिलकीतून लोकमंगल परिवाराचे वटवृक्षात रुपांतर केले आहे.

दत्तात्रय खराडे,बी.एस.खामकर यांची भाषणे झाली.यावेळी मोहन गुजर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वागत संतोष भोसले यांनी,प्रास्ताविक संचालक शितल शहाणे यांनी केले. सुत्रसंचालन विश्वनाथ चव्हाण यांनी केले. आभार जयवंत हावळ यांनी मानले.

कार्यक्रमास सल्लागार सदस्य बाळासाहेब सूर्यवंशी,प्रकाश तिराळे,प्रविण दाभोळे, एम.टी.सामंत,संदीप किल्लेदार,विनायक हावळ,नगरसेवक सुनील रणवरे,प्राचार्य पी.डी.मगदूम,अनंत फर्नांडिस,सिकंदर जमादार,पप्पू बारदेस्कर,सुरज एकल,पप्पू ढेरे,अविनाश चांदेकर,रामचंद्र सातवेकर, अभिजीत भोईटे,रेवण सिध्दापूरे,कुंदन ताकमोगे,ओंकार म्हेत्तर,शाखाधिकारी आनंदा पोवार,सुनिल खराडे,शितल पावले यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.