Header Ads

मिरजेत पोलिसांचा भव्य रूट मार्च; ३०० हून अधिक जवानांचा सहभाग

 मिरजेत पोलिसांचा भव्य रूट मार्च; ३०० हून अधिक जवानांचा सहभाग.


-----------------------------------

मिरज | प्रतिनिधी : राजू कदम.

----------------------------------

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मिरज पोलिसांकडून शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संचलनात २० वरिष्ठ अधिकारी, १७० पोलीस अंमलदार, १४० होमगार्ड तसेच SRPF जवान सहभागी झाले.



शहरातील मुख्य बाजारपेठ, संवेदनशील परिसर आणि प्रमुख चौकांमधून पोलिसांनी संचलन केले. गणेशोत्सव काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता व शिस्त पाळावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

No comments:

Powered by Blogger.