Header Ads

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कारवाई; मिरजेत २८ जणांना प्रवेशबंदी

 गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कारवाई; मिरजेत २८ जणांना प्रवेशबंदी.

----------------------------------

मिरज | प्रतिनिधी : राजू कदम.

---------------------------------

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरज पोलिसांनी २८ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांच्या आदेशानुसार १९ सप्टेंबर दुपारी १२ ते २५ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधितांना सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीत प्रवेश करण्यास तसेच निवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या यादीत मिरज शहरातील विविध भागांतील २८ जणांचा समावेश असून, पोलिसांनी गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात संवेदनशील व्यक्तींवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.