तासगाव पोलीस ठाणे गणपती विसर्जन मिरवणूक जल्लोषात, पारंपारिक वाद्य हलगीचा ठेका घुमला.
तासगाव पोलीस ठाणे गणपती विसर्जन मिरवणूक जल्लोषात, पारंपारिक वाद्य हलगीचा ठेका घुमला.
---------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
तासगाव पोलिसांनी पोलीस ठाण्यात दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा बसवले होते,नूतन पोलीस उपाधीक्षक किरण अवचर साहेब व पोलीस निरीक्षक विशाल टकले साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पा यंदाही बसवले होते, यामध्ये सर्व पोलीस बांधव महिला पोलीस व सर्व होमगार्ड अगदी भक्तिभावाने दररोज सकाळ व सायंकाळी आरती करत होते,
आज पोलीस निरीक्षक विशाल टकले साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाणे पासून भव्य मिरवणूकिला सुरवात झाली, सर्वांनी पारंपारिक वेश परिधान केले होते, हलगीचा ठेका व लेझीम हे वाद्य सुरू होते, व उघड्या जीपमध्ये गणपती बाप्पा यांना बसवले होते,
सर्व पोलीस बांधवांनी फेटाही परिधान केला होता, या मिरवणुकीत पोलिस निरीक्षक विशाल टकले, दीपक पाटील, तासगाव शहर बीटचे बजरंग थोरात, मांजर्डे बीटचे सचिन जोजांळ, महिला पोलीस, पासपोर्ट विभागाच्या नलावडे मॅडम, व इतर नूतन पोलीस अधिकारी ,नूतन पोलीस, सर्व होमगार्ड बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर काही पोलीस व होमगार्ड यांनी हलगीच्या ठेक्यावर लेझीम खेळले,
ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,ते गणपती मंदिर पर्यंत वाजत गाजत गेली, त्यानंतर भावनिक निरोप पुणदी तलाव येथे केला. यावेळी काही पोलिसांच्या डोळ्यातही भावनिक अश्रू होते,
अशाच नवनवीन अपडेट

No comments: