Header Ads

पत्रकारांची नवी ताकद! इंदापूरमध्ये पत्रकार सेवा संघाची दमदार तालुका कार्यकारिणी जाहीर.

 पत्रकारांची नवी ताकद! इंदापूरमध्ये पत्रकार सेवा संघाची दमदार तालुका कार्यकारिणी जाहीर.

------------------------------------

इंदापूर प्रतिनिधी 

 गणेश धनवडे

------------------------------------

पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटित लढ्याचा निर्धार; निलेश गायकवाड यांच्याकडे तालुका अध्यक्षपदाची धुरा.

इंदापूर तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्यासाठी पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंदापूर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पुणे जिल्हा अध्यक्ष बबनराव धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

नवीन कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी निलेश गायकवाड, उपाध्यक्षपदी संजय वायसे, सचिवपदी अभिजीत देशपांडे, खजिनदारपदी संजय शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुखपदी महेश कळसाईत यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्यांची निवड

दत्तात्रय पारेकर, भिमसेन उबाळे, संतोष तावरे, संतोष कदम, अरुण भोई, प्रविण पिसे, अंकुश भोसले, महेश गडदे, सीताराम मदने आणि प्रवीण वाघमोडे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटित आवाज

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, अडचणी आणि हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पत्रकारिता क्षेत्राचा विकास, पत्रकारांचे संरक्षण आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे उद्दिष्टही जाहीर करण्यात आले.

इंदापूर तालुका पत्रकार सेवा संघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

No comments:

Powered by Blogger.