मिरज-पंढरपूर महामार्गावर काळाचा घाला! देशिंग-खरसिंग फाट्याजवळ कार खाईत कोसळली; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर!
मिरज-पंढरपूर महामार्गावर काळाचा घाला! देशिंग-खरसिंग फाट्याजवळ कार खाईत कोसळली; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर!
सांगली : राजू कदम
मिरज-पंढरपूर महामार्गावर देशिंग खरसिंग फाट्याजवळ भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहन डिव्हायडरला धडकून रस्त्यालगतच्या खाईत कोसळले असा प्रार्थमिक अंदाज आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिरज-पंढरपूर महामार्गावरील देशिंग खरसिंग फाट्याजवळ हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, हैदराबाद, तेलंगणा येथील प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटून ते प्रथम डिव्हायडरला धडकले आणि त्यानंतर पलटी होऊन रस्त्यालगतच्या खाईत कोसळले.
या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची नावे प्रशांत पेरळे, मिथुन चंदगडकर आणि साईकुमार भास्करकुमार अशी आहेत. तिघांनाही पुढील उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ह्यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, इर्शाद कवठेकर ह्यांनी सहभाग घेतला.

No comments: