Header Ads

२१ व्या वर्षी जीवनयात्रा संपवली; संकेत कृष्णात गुटके यांच्या निधनाने हळहळ!

 २१ व्या वर्षी जीवनयात्रा संपवली; संकेत कृष्णात गुटके यांच्या निधनाने हळहळ!

राशिवडे बुद्रुक येथे तरुणाची आत्महत्या; मृत्यूमागील कारण अस्पष्ट, राधानगरी पोलिसांकडून तपास सुरू


राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे

राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) : अवघ्या २१व्या वर्षी संकेत कृष्णात गुटके या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राशिवडे बुद्रुक येथे घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, संकेतच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास संकेत हा आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सुमारे ११.४५ वाजता तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संकेतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राधानगरी पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पुढील तपास करीत आहेत.

तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने राशिवडे बुद्रुक परिसरात शोक व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

No comments:

Powered by Blogger.