Header Ads

कुपवाड एमआयडीसीत संशयास्पद वाहनात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; परिसरात खळबळ!

 कुपवाड एमआयडीसीत संशयास्पद वाहनात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; परिसरात खळबळ!

दुर्गंधीमुळे प्रकार उघड; ‘आयुष हेल्पलाईन’ टीमची तत्परता, मृतदेह मिरज सिव्हिलमध्ये रवाना.

सांगली | प्रतिनिधी :

कुपवाड एमआयडीसी परिसरात एका संशयास्पद वाहनात तीव्र दुर्गंधी येत असलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ‘आयुष हेल्पलाईन’च्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह वाहनातून बाहेर काढला. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.


कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ड्युटी अंमलदारांकडून वाहनातून असह्य दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयुष हेल्पलाईनची आपत्कालीन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाली. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

पथकाने खबरदारी घेत मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात रवाना केला. या मदतकार्यात आयुष हेल्पलाईनचे प्रमुख अविनाश पवार यांच्यासह नरेश पाटील, चिंतामणी पवार, मोसीन लोणी, प्रमोद पाटील, रोहन कांबळे आणि प्रमोद जाधव यांनी सहभाग घेतला. स्थानिक पोलिसांचे आणि नागरिकांचेही सहकार्य लाभले.

मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.