Header Ads

शिक्षकांनी वह्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा.

 शिक्षकांनी वह्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा.



सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी

वाढदिवस म्हटलं की  बॅनर,पार्टी इत्यादी गोष्टीवर होणारा अनाठाई खर्च  हा अनाठाई खर्च टाळून  पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या  केंद्र सावरगाव  (बं)तील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मांडवा येथे काही दिवसापूर्वीच नियुक्ती झालेले  सहाय्यक शिक्षक  दिनेश पुलाते यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ८२वह्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा.

वर्ग तिसरा,चौथा,आठवा  या वर्गातील  ५२तर पाचवा, सहावा, सातवीतील३० विद्यार्थ्यांना आता पर्यंत ८२ वह्याचे वाटप केले . उर्वरित  पहिला व दुसरा  या वर्गातील विद्यार्थ्यांना एक-दोन दिवसात वह्याचे वाटप करणार असे सांगितले. शाळेत एकूण पटसंख्या  ११६ आहे.

या वह्यामध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न इंग्रजी शब्द, आणि परिपाठात वाचन करायचे  यामुळे त्यांची महादीपची पण तयारी होऊ शकते. सहाय्यक शिक्षक दिनेश पुलाते यांनी  वह्या वाटप करण्याच्या मागचा उद्देश सांगितला. 

यावेळी मुख्याध्यापक नरेश नालमवार, शिक्षण प्रेमी विठ्ठल राठोड, शिक्षिका भारती  शेळके, वैशाली रणमले, विश्रांती मस्के, भाग्यश्री यादव,  तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.