Header Ads

कांटे येथे पीक नुकसानीचे पंचनामे; कृषी अधिकारी अनिल गुजले यांच्या कार्याचे शेतकऱ्यांकडून कौतुक.

 कांटे येथे पीक नुकसानीचे पंचनामे; कृषी अधिकारी अनिल गुजले यांच्या कार्याचे शेतकऱ्यांकडून कौतुक

शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

शाहुवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर

मो.9404477703


शाहुवाडी : कांटे येथे पीक नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी अनिल गुजले यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत पीक नुकसानीची माहिती जाणून घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

पीक नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती समजून घेणे, नुकसानीची पाहणी करणे आणि पंचनाम्याची प्रक्रिया पार पाडणे, यामुळे शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडण्याची संधी मिळाली. कृषी अधिकारी अनिल गुजले यांनी प्रत्यक्ष शेतावर उपस्थित राहून केलेल्या पाहणीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


या वेळी पोलीस पाटील जगदीश पाटील, शेतकरी चिमाजी पाटील, चेतन पाटील, आनंदा तेलवणकर, बबन खामकर, केरबा साळोखे, भगवान तेलवणकर, विकास नेमन किरण पाटील, सुनिल पाटील ग्राम पंचायत सदस्य,यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. तसेच रोजगार सेवक सहदेव साळोखे यांनीही यावेळी उपस्थिती दर्शविली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणारे अधिकारी हीच शेती क्षेत्रासाठी सकारात्मक बाब असून, कृषी अधिकारी अनिल गुजले यांच्या प्रत्यक्ष पाहणीच्या कार्याचे कांटे येथील शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.