Header Ads

काटे-भोगाव येथे दसरा महोत्सवात महिलांचा सन्मान ; विधवा महिलांचा विशेष गौरव.

 काटे-भोगाव येथे दसरा महोत्सवात महिलांचा सन्मान ; विधवा महिलांचा विशेष गौरव..


कळे प्रतिनिधी

साईश मोळे

९५९५३१६२६६


कळे:- काटे-भोगाव (ता. पन्हाळा) येथे झालेल्या दसरा महोत्सव कार्यक्रमात विधवा महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून एक आगळा-वेगळा आदर्श या महोत्सवात ठेवण्यात आला.


महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोंगी भजनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती दिपाली पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच कला-क्रीडा क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीमती नंदिनी विश्वास आंग्रे, दिपाली खटांगळेकर, सीमा देसाई, संगीता पानारी व कल्पना लाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच प्रियांका पाटील व सिव्हिल हॉस्पिटलचे लॅब टेक्निशियन उत्तम कमलाकर उपस्थित होते.


महोत्सवाच्या सांगता समारंभात न्यू कॉलेजच्या प्रा. डॉ. जगतकर मॅडम यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. यावेळी त्या म्हणाल्या, "सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन महिलांच्या हस्ते करून आयोजकांना खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कळल्या आहेत असे मला वाटते. असा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच होत आहे." याबद्दल त्यांनी कमिटीचे आभार मानले. या व्याख्यानाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील व विश्वास घरपणकर होते. यावेळी मंडळाचे राजाराम घरपणकर, प्रकाश चौगुले, संदीप लाड, सागर खटांगळेकर, सुरेश पाटील, धनाजी वाळवेकर, उत्तम लग, शिवाजी वाळवेकर, संदीप चव्हाण, बबन शिखरे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप राजे यांनी केले तर आभार बबन खटांगळेकर यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.