उचगावात गांजाचा ‘डील’ उधळला! १० किलो गांजासह दोघे जाळ्यात; ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त.
उचगावात गांजाचा ‘डील’ उधळला! १० किलो गांजासह दोघे जाळ्यात; ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त.
कोल्हापूर | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापूर शहर आणि परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांचा डाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावला. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा, उचगाव येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत १० किलो गांजा, दुचाकी आणि तीन मोबाईलसह एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राम मारुती सावंत (वय २१) आणि राज गणेश पारखे (वय २२, दोघेही रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि प्रदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयित कोल्हापूर शहर व परिसरात गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोघांविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

No comments: