Header Ads

मिरजेत कोयत्यांचा धुमाकूळ! ८ ते १० जणांच्या टोळक्याकडून घरांची तोडफोड; परिसरात दहशत..

 मिरजेत कोयत्यांचा धुमाकूळ! ८ ते १० जणांच्या टोळक्याकडून घरांची तोडफोड; परिसरात दहशत.

सांगली मिरज प्रतिनिधी राजू कदम.

मिरज | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

मिरज शहरात कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन आलेल्या टोळक्याने घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडत, दरवाजांवर कोयत्याने वार करत दुचाकींची तोडफोड केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी जय हिंद कॉलनी, समतानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, गौस ग्यासोद्दीन सय्यद, आस्कर हारुन खतीब व त्यांचे ७ ते ८ साथीदार मोटारसायकलींवरून कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन संबंधित व्यक्तीच्या घरी आले. त्यांनी घरासह शेजारील दोन भाडेकरूंच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या, दरवाजावर कोयत्याने वार केले तसेच रस्त्यावर उभ्या दुचाकींचे नुकसान केले.

रेल्वे स्टेशनजवळील दुकानातील भांडणाचा राग मनात धरून हा प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.