Header Ads

वंचितांच्या घरीही उजळली दिवाळी; 'उमेद'चा ११ वर्षांपासूनचा सेवायज्ञ

 वंचितांच्या घरीही उजळली दिवाळी; 'उमेद'चा ११ वर्षांपासूनचा सेवायज्ञ.


कळे प्रतिनिधी

सुनिल मोळे


 सर्वत्र दिवाळीचा आनंद असताना माळावरच्या झोपडपट्टीत मात्र अंधारच होता. तो अंधार दूर करत 'उमेद फौंडेशन'च्या कार्यकर्त्यांनी यंदाही वंचित बांधवांची दिवाळी गोड केली.

रविवारी सकाळी सागरूळ फाटा, कोपार्डे येथील माळावर राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. सलग ११ व्या वर्षी फौंडेशनने हा उपक्रम राबवला. यावेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जालना जिल्ह्यातील एकूण ५५० गरजू कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आला.

झोपडपट्टीसमोर रांगोळी काढत,  आकाशकंदील, फटाके वाचवत कार्यकर्त्यांनी वातावरणात दिवाळीचा उत्साह निर्माण केला. उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रत्येक कुटुंबाला दिवाळी फराळ, पणती, साबण, तेल, उटणे भेट देण्यात आले. फराळ मिळाल्यानंतर वंचितांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शेकडो दानशूरांनी सहकार्य केले. फराळ वाटपाचे नियोजन अध्यक्ष प्रकाश गाताडे, कुंभी कासारी बँकेचे संचालक प्रा. एस. पी. चौगुले , विनायक पाटील, प्रदीप नाळे, दिगंबर पाटील, अभय पाटील, सचिन बगाडे, तातोबा डांगे, डॉ. तुकाराम खाडे, संदीप कुंभार, किशोर भोसले, इंद्रजित खाडे, सनी नाळे, सरदार घराळ, भीमराव चाबूक, सनी नाळे, अमर नाळे, नवीनचंद्र सनगर, खंडेराव पाटील, राजवर्धन गाताडे, अभिषेक गाताडे यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.