Header Ads

रेंदाळमधील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी ग्रामपंचायत सरपंचांचे पोलिसांना निवेदन; शवविच्छेदन अहवाल तातडीने देण्याची मागणी - सौ सुप्रिया पाटील

 रेंदाळमधील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी ग्रामपंचायत सरपंचांचे पोलिसांना निवेदन; शवविच्छेदन अहवाल तातडीने देण्याची मागणी - सौ सुप्रिया पाटील

सचिन कुंभार 

रेंदाळ प्रतिनिधी 

9021281100


रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील सम्राट अशोकनगर परिसरातील दोन चिमुकल्या बालकांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन्ही बालकांचे शवविच्छेदन अहवाल (PM Report) तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रेंदाळ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांनी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सम्राट अशोकनगर परिसरातील वरद शिंदे (वय ५ वर्षे) आणि राही शिंदे (वय २ वर्षे) या दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दूषित पाण्यामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    निवेदनात सरपंचांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या तक्रारीनुसार आरोग्य विभागामार्फत संबंधित परिसरातील स्थानिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच मृत बालकांच्या शरीरातील पाण्याचे नमुने उपविभागीय प्रयोगशाळा, शिरोळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत पाण्यामुळे कोणताही संसर्ग झाल्याचे सिद्ध होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी बिनबुडाच्या व खोट्या असल्याचे म्हणत, हेतुपुरस्सर बदनामी व त्रास देण्याच्या उद्देशाने आरोप केले जात असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.मात्र, या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी दोन्ही बालकांचे शवविच्छेदन अहवाल (PM Report) प्राप्त होणे आवश्यक असल्याचे सरपंचांनी म्हटले आहे. पोलिसांनी आपल्या स्तरावरून तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शवविच्छेदन अहवालाची प्रत ग्रामपंचायत प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दोन चिमुकल्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? दूषित पाण्याचा या घटनेशी संबंध आहे का? आणि प्रशासनाच्या जबाबदारीत काही त्रुटी राहिल्या आहेत का? या प्रश्नांची उत्तरे आता शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल चौकशीतूनच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण रेंदाळ गावाचे या चौकशीकडे लक्ष लागले आहे

No comments:

Powered by Blogger.