लोकनियुक्त महिला सरपंच सौ. सुप्रिया पाटील यांचा दिव्यांग बांधवांसाठी पुढाकार; ९ लाखांचा निधी वितरित
लोकनियुक्त महिला सरपंच सौ. सुप्रिया पाटील यांचा दिव्यांग बांधवांसाठी पुढाकार; ९ लाखांचा निधी वितरित
दहा वर्षांपासून प्रलंबित ६ लाखांसह चालू बॉडीचा ३ लाखांचा निधी दिला; रॅम्प, कार्यालयीन जागा आणि गाळ्यांचीही सुविधा
सचिन कुंभार
रेंदाळ प्रतिनिधी
9021281100
रेंदाळ : दिव्यांग बांधवांच्या हक्कांना प्राधान्य देत रेंदाळच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ. सुप्रिया पाटील यांनी दिव्यांगांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली आहे.
मागील दोन ग्रामपंचायत बॉडींचा सुमारे दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला ५ टक्के दिव्यांग निधी सुमारे ६ लाख रुपये, तसेच चालू ग्रामपंचायत बॉडीचा ५ टक्के दिव्यांग निधी सुमारे ३ लाख रुपये, असा एकूण ९ लाख रुपयांचा निधी दिव्यांग बांधवांना पूर्णपणे वितरित करण्यात आला आहे.
केवळ आर्थिक निधी वितरित करून न थांबता दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत कार्यालयात ये-जा करताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग बांधवांना कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या गाळ्यांबाबतही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक मदतीसोबतच त्यांना स्वावलंबी बनविणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा देणे, या उद्देशाने लोकनियुक्त सरपंच सौ. सुप्रिया पाटील यांनी हा पुढाकार घेतला आहे.
दिव्यांग बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निधीचा प्रश्न मार्गी लागल्याने दिव्यांग बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या निर्णयाची परिसरात चर्चा सुरू आहे.

No comments: