Header Ads

सांगली बस स्थानक परिसरात स्वच्छतेचा बोजवारा! तुटके दरवाजे, रस्त्यावर सांडपाणी; प्रवाशांच्या जीविताशी खेळ

 सांगली बस स्थानक परिसरात स्वच्छतेचा बोजवारा! तुटके दरवाजे, रस्त्यावर सांडपाणी; प्रवाशांच्या जीविताशी खेळ.

राजू कदम 

सांगली : सांगली येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट झाली असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


बस स्थानकातील स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले आहेत. सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. घाण पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. सांगलीचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या या स्थानकाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.