पाचगावात तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जण ताब्यात!
पाचगावात तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांचा छापा; १३ जण ताब्यात!
६ दुचाकी, १३ मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल ३ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त; जागामालकासह १३ जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई.
करवीर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात करवीर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पाचगाव येथील शांतीनगर, गाडगीळ कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १३ जणांना पकडले. या कारवाईत सहा दुचाकी, १३ मोबाईल हँडसेट आणि रोख रकमेसह एकूण ३ लाख ८६ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी संबंधित ठिकाणी तीन पानी पत्त्यांचा 'पलास' नावाचा जुगार पैशांची बाजी लावून खेळला जात असल्याचे आढळले.
या कारवाईत सागर हवालदार, रवींद्र भोसले, ईश्वर कांबळे, प्रमोद इंगवले, विशाल पोवार, प्रदीप गाडगीळ, उत्तम हवालदार, शिवाजी हवालदार, नितीन पाटील, दत्तात्रय इंगवले, प्रतीक गुरव, अनिल ईराचे आणि विशाल खेतल अशा १३ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जागामालकाचाही समावेश आहे.
सर्व आरोपींविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व गुन्हे शोध पथकाने केली.
अवैध धंदे करणाऱ्यांनो सावधान! करवीर पोलिसांची धडक कारवाई सुरूच; पाचगावातील जुगार अड्ड्यावर छाप्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले!

No comments: