Header Ads

इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी .

 इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी .   


       इंदापूर तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे.

 पौर्णिमेनिमित्त गावातील दत्त मंदिरामधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या सोहळ्यामध्ये सर्व स्वामीभक्त महिलांनी चौका चौकांमध्ये रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. पालखी मंदिरामध्ये आल्यानंतर श्री ह.भ.प.अंकुश महाराज बनसोडे कचरवाडी निमगाव केतकी यांचे सुश्राव्य असे दत्त चरित्रावर प्रवचन झाले. तसेच मंदिरातील रांगोळीची सुंदर सेवा सौ शितल सुनील टकले यांनी केली. तसेच पालखीची सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी नेहमीप्रमाणे केली. तसेच  स्वामींच्या हाराची  सेवा श्री राजाराम संभाजी जाधव यांनी नेहमीप्रमाणे केली.  रांगोळी साठी लागणारी फुलांची सेवा श्री  महादेव मारुती माळी यांनी नेहमीप्रमाणे केली. तसेच दिंडी सोहळ्याला महादेव भजनी मंडळाने साथ दिली.  तसेच जप व आरती झाल्यानंतर सर्व स्वामी भक्तांना श्री नितीन सदाशिव कारंडे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व स्वामीभक्त महिला व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.