Header Ads

सामाजिक उपक्रमाने श्रीमंत सौ. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा

 सामाजिक उपक्रमाने श्रीमंत सौ. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा

(प्रतिनिधी): रहिम पिंजारी

कोल्हापूर:समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या श्रीमंत सौ. मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या औचित्याने 'राजे फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने कोल्हापुरातील चंबुगडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील महिलांच्या हस्ते केक कापून श्रीमंत मधुरिमाराजे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, फाउंडेशनच्या वतीने आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळे आणि बिस्किटांच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. राजे फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल मातोश्री वृद्धाश्रमाच्या वतीने त्यांचे आभार मानून त्यांना आभार पत्र देण्यात आले.

याप्रसंगी राजे फाउंडेशनचे संस्थापक मा. रियाज जैनापुरे, नरेंद्र पोवार, रशीद सय्यद, नरेंद्र गागडे, रियाज गोलंदाज, शिवाजी चव्हाण, अमोल शेटके, इम्रान मुजावर, उत्तम शेलार, अर्जुन बर्थडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगुले, योगेश मुळीक, योगेश कांबळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.