शक्तिपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; प्रस्तावित सर्वेक्षण रोखण्यासाठी शेतकरी मैदानात!
शक्तिपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; प्रस्तावित सर्वेक्षण रोखण्यासाठी शेतकरी मैदानात!
‘मागणी नसताना महामार्ग कशासाठी?’ असा संतप्त सवाल; महिला शेतकऱ्यांसह नऊ गावांतील शेतकऱ्यांचे सर्वेक्षणस्थळी ठाण.
बोरगाव | सांगली प्रतिनिधी : राजू कदम
वाळवा तालुक्यात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी सोमवारी तीव्र विरोध दर्शविला. कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाकडून शेतकऱ्यांवर शक्तिपीठ महामार्ग लादला जात असल्याचा आरोप करत शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बाधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. प्रस्तावित महामार्गाच्या मोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा दाखल होणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी एकत्र येत संभाव्य सर्वेक्षणस्थळी दिवसभर ठाण मांडले.
सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, बोरगाव, वाळवा, ईश्वरपूर, कामेरी, इटकरे आणि ऐतवडे खुर्द या बाधित गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. आपल्या जमिनी आणि शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत प्रस्तावित सर्वेक्षणाला विरोध केला.
मसुचीवाडी परिसरातील नाईकबा रस्ता-भवांडा, जुनेखेड येथील सहदेव रंगराव पाटील यांच्या घराशेजारी, नवेखेड येथील चांदोली वसाहत बसथांबा तसेच नवेखेड-ईश्वरपूर रस्त्यावरील तुरचकर वस्ती परिसरात शेतकऱ्यांनी विशेष लक्ष ठेवले होते. शासनाची वाहने आणि सर्वेक्षणासाठी येणाऱ्या यंत्रणेला रोखण्यासाठी शेतकरी दिवसभर संभाव्य सर्वेक्षणस्थळी उपस्थित राहिले.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने २० नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रामुळे सर्वेक्षणाच्या स्वरूपाबाबत महत्त्वाची माहिती समोर �

No comments: