कुपवाड एमआयडीसी परिसरात अपघात; सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका चालकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला तात्काळ उपचार
कुपवाड एमआयडीसी परिसरात अपघात; सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णवाहिका चालकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला तात्काळ उपचार
कुपवाड / सांगली:
कुपवाड एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीजवळ आज एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती. अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी देताच मदत पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातून मदतीसाठी मोठी धावपळ सुरू झाली. यावेळी सूर्यवंशी ॲम्बुलन्सचे अतुल सूर्यवंशी आणि चिंतामणी पवार यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून मिरज सिव्हिल येथे हलवण्यास मोलाची मदत केली. त्यांच्यासोबत स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला.
या मदतकार्यासाठी घटनास्थळी 'आयुष हेल्पलाइन टीम' आणि 'पै. चंद्रहार दादा पाटील जीवरक्षक टीम' या दोन्ही पथकांचे कार्यकर्ते तात्काळ दाखल झाले होते. दोन्ही टीम आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयामुळे जखमी महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले. वेळेवर उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असून, या तत्पर मदतकार्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.

No comments: