Header Ads

सारी पोलीस एकीकडे, जावेद सेठ एकीकडे!' मोर्शीतील कथित गुटखा किंगची जोरदार चर्चा; पोलिसांसमोर शोधाचे आव्हान!

 'सारी पोलीस एकीकडे, जावेद सेठ एकीकडे!' मोर्शीतील कथित गुटखा किंगची जोरदार चर्चा; पोलिसांसमोर शोधाचे आव्हान!


अमरावती | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी

बॉलिवूडच्या 'डॉन' चित्रपटातील गाजलेला डायलॉग आजही अनेकांच्या ओठांवर असतो... 'डॉन को ढूंढना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है!' मात्र, सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरात याच डायलॉगची आठवण करून देणारे एक नाव चर्चेत आले आहे. ते नाव म्हणजे कथित गुटखा किंग जावेद सेठ!

मोर्शी परिसरात जावेद सेठ यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, गुटख्याच्या कथित अवैध व्यवसायातून त्यांनी मोठे आर्थिक साम्राज्य उभे केल्याच्या चर्चा रंगत आहेत. या प्रकरणी मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जावेद सेठ यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जावेद सेठ नेमके कुठे आहेत? त्यांना पोलिस कधी शोधणार? आणि कथित गुटखा व्यवसायामागील संपूर्ण नेटवर्क कधी उघड होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

चार दशकांपूर्वी या परिसरात हारून सुपारीवाला यांचे नाव चर्चेत होते. आता त्याच धर्तीवर जावेद सेठ यांचे नाव चर्चेत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगत आहे.

दरम्यान, सफेदपोश मंडळींपासून ते राजकीय वर्तुळ आणि पोलीस यंत्रणेपर्यंत जावेद सेठ यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या कथित गुटखा साम्राज्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? अवैध व्यवसायाचे जाळे किती मोठे आहे? याचा तपासातूनच उलगडा होणे अपेक्षित आहे.

एकीकडे पोलिसांचा शोध, तर दुसरीकडे जावेद सेठ यांच्याभोवती वाढते प्रश्नचिन्ह! आता मोर्शी पोलिसांच्या तपासातून या कथित गुटखा साम्राज्याचे वास्तव समोर येणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.