Header Ads

शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!

 शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर!

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तातडीने प्रतिसाद; साताऱ्यात आनंदोत्सव, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह नगरसेवकांकडून अभिवादन.


सातारा | प्रतिनिधी- अमर इंदलकर .

सातारा शहरातील शिवतीर्थ येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. या निधी मंजुरीमुळे साताऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साताऱ्याचे लोकप्रतिनिधी तथा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. काल झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी निधी मंजूर झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

या निर्णयानंतर साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि नगरसेवकांनी शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा जपणाऱ्या शिवतीर्थाच्या विकासाच्या दृष्टीने हा निधी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

निधी मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी, कामाचा दर्जा आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण होणे याकडे साताऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.