कोल्हापुरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमित धुमाळ यांचे निधन; वयाच्या ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
कोल्हापुरात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमित धुमाळ यांचे निधन; वयाच्या ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
कोल्हापूर | प्रतिनिधी विजय बकरे
कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर परिसरातील गणेश पार्क, आठवी गल्ली येथील रहिवासी अमित दत्तात्रय धुमाळ (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमित धुमाळ हे अपना बँकेत कार्यरत असलेल्या सौ. अमृता अमित धुमाळ यांचे पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
त्यांचा रक्षा विसर्जन विधी रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी, कोल्हापूर येथे होणार आहे.
अमित धुमाळ यांच्या अकाली निधनाने धुमाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments: