रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा सापळा! दुचाकी चोरट्याचा गेम ओव्हर; २ लाखांच्या चार गाड्या जप्त!
रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा सापळा! दुचाकी चोरट्याचा गेम ओव्हर; २ लाखांच्या चार गाड्या जप्त!
वुडलँड हॉटेल परिसरातील चोरीचा तपास करताना मोठा खुलासा; कोडोलीतील ३१ वर्षीय संशयित जेरबंद, शाहूपुरी पोलिसांकडून चार गुन्ह्यांची उकल.
कोल्हापूर | प्रतिनिधी – रहिम पिंजारी
कोल्हापुरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ रोखण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तब्बल २ लाख रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एकाच कारवाईत शाहूपुरी पोलीस ठाण्यातील चार दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
वुडलँड हॉटेलजवळून दुचाकी चोरी; पोलिसांनी लावला छडा!
विठ्ठल शिवाजी सुतार (वय ४३, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आदित्य कॉर्नरजवळील वुडलँड हॉटेल परिसरातून चोरीला गेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीने चोरटा जाळ्यात!
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीची मोटारसायकल घेऊन एक इसम कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिराजवळ येणार असल्याची खबर मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांनी संशयित जयकुमार राजेंद्र पाटील (वय ३१, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याला दुचाकीसह ताब्यात घेतले.
MH 09 DC 7597
MH 09 EF 8953
MH 04 BE 4634
प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीच्या या चार दुचाकींची एकूण किंमत २ लाख रुपये आहे. या कारवाईमुळे चार चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली.
या पथकात सुशिलकुमार गायकवाड, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर, गौरव शिंदे, सचिन पांगे, प्रशांत आवळे व गणेश पाटील यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करीत आहेत.
चार गुन्ह्यांची उकल, चार दुचाकी जप्त आणि एका संशयिताला अटक! शाहूपुरी पोलिसांच्या या कारवाईने दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments: