दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती महेश कोल्हे यांनी याप्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाहनाला जाणूनबुजून आग लावण्यात आली की आगीमागे अन्य काही कारण आहे, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
एकीकडे उद्या रुग्णालयाच्या लोकार्पणाचा सोहळा, तर दुसरीकडे आदल्याच रात्री वैद्यकीय अधीक्षकांच्या वाहनाला आग! या घटनेने सोळांकूरमध्ये चर्चेला उधाण आले असून, आता पोलिस तपासातून नेमके सत्य बाहेर येण्याची प्रतीक्षा आहे.
No comments: