अवघ्या २० दिवसांत श्री गुरुदत्त शुगर्सची दमदार कामगिरी!
अवघ्या २० दिवसांत श्री गुरुदत्त शुगर्सची दमदार कामगिरी!
एक लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण; मा. श्री. माधवराव घाटगे साहेबांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल!
टाकळीवाडी : प्रतिनिधी
टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये अवघ्या २० दिवसांत एक लाख टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याच्या या कामगिरीमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी मजूर आणि ऊस वाहतूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी वाटचालीत कारखान्याचे चेअरमन मा. श्री. माधवराव घाटगे साहेब तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा श्री राहुल घाटगे साहेब आणि मा. श्री धीरज घाटगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले नियोजन आणि कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
अवघ्या वीस दिवसांत एक लाख टन गाळपाचा टप्पा गाठणे ही केवळ आकडेवारी नसून त्यामागे नियोजन, मेहनत, शिस्त आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद दिसून येते. कारखान्याच्या या कामगिरीमुळे आगामी गळीत हंगामाबाबत अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांचा विश्वास, कामगारांची मेहनत आणि व्यवस्थापनाचे नियोजन यांची सांगड म्हणजेच श्री गुरुदत्त शुगर्सची प्रगती..! एक लाख टन गाळपाच्या यशस्वी टप्प्याबद्दल श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेडचे मा. श्री. राहुलजी घाटगे साहेब, सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे हार्दिक अभिनंदन!
शेतकऱ्यांच्या विश्वासाला प्रगतीची जोड, श्री गुरुदत्त शुगर्सची यशस्वी घोडदौड

No comments: