Header Ads

मैत्री परिवाराच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

 मैत्री परिवाराच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ डिसेंबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

रक्तदानातून जपूया माणुसकीचे नाते; मैत्री परिवाराचा सामाजिक उपक्रम


शिरोळ तालुका | महाराष्ट्र फ्रंटलाईन न्यूज इचलकरंजी : प्रतिनिधी अर्जुन धोंडीराम धुमाळे

इचलकरंजी येथील मैत्री परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दिनांक १५ डिसेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, हा सामाजिक संदेश घेऊन मैत्री परिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

हे रक्तदान शिबिर मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून बालाजी चौक, विक्रमनगर, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आले आहे.

मैत्री परिवाराच्या ११ वर्षांच्या सामाजिक वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, समाजातील तरुणांनी, नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


एका रक्तदानाने वाचू शकते अनेकांचे आयुष्य!

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे चला, रक्तदान करूया आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ करूया!


रक्तदान शिबिराचा तपशील

- आयोजक : मैत्री परिवार, इचलकरंजी

- निमित्त : ११ वा वर्धापन दिन

- दिनांक : मंगळवार, १५ डिसेंबर २०२६

- वेळ : सकाळी ७ वाजता

- ठिकाण : बालाजी चौक, विक्रमनगर, इचलकरंजी


मैत्री परिवाराचा संकल्प – थेंब थेंब रक्ताचा... असंख्य जीवांच्या रक्षणाचा!

No comments:

Powered by Blogger.