Posts

सांगलीतील डॉक्टर व्यावसायिकाचे मोटर लिलावत 12 लाखाची फसवणूक.

Image
  सांगलीतील डॉक्टर व्यावसायिकाचे मोटर लिलावत 12 लाखाची फसवणूक.   ---------------------------------------  मिरज तालुका  प्रतिनिधी  राजु कदम --------------------------------------- लिलावातून मोटार मिळवून देतो असे सांगून सांगलीतील एका नामांकित मेडिकल व्यावसायिकाची तब्बल १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भिवंडी (जि. ठाणे) आणि सांगलीतील दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक महावीर काशाप्पा आलासे (वय ५५, रा. शिंदे मळा, सांगली) यांच्यासोबत घडली असून, संशयितांची नावे अनिल शिवराम कोंडा (रा. पद्मानगर, भिवंडी, जि. ठाणे) व गणेश सुरेश पाटील (रा. अरिहंत कॉलनी, सांगली) अशी आहेत. आलासे यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर आलासे यांची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी गाड्यांची खरेदी-विक्री करणारा गणेश पाटील याच्याशी झाली होती. त्या वेळी आलासे यांनी स्वतःच्या वापरासाठी गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पाटील याने अथर्व मोटर्सचा मालक असलेल्या अनिल कोंडा याच्याकडे लिलावात गाडी उपलब्ध अ...

जयसिंगपूरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त रूट मार्च.

Image
  जयसिंगपूरात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त रूट मार्च. -------------------------------  नामदेव भोसले ------------------------------- गणेशोत्सव 2025 व ईद-ए-मिलाद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून आज (दि. 26 ऑगस्ट 2025) सकाळी 10.30 ते 11.15 वाजेच्या दरम्यान भव्य रूट मार्च आयोजित करण्यात आला. हा रूट मार्च पोलीस ठाणे येथून सुरू होऊन डेबोंस कॉर्नर, मच्छी मार्केट, बाजारपेठ, क्रांती चौक, बस स्टॅन्ड व गांधी चौक असा मार्गक्रमण करीत पार पडला. त्यानंतर गांधी चौक येथे दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पो.उपनिरीक्षक किशोर अंबुडटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ पोलीस अधिकारी, १५ पोलीस अंमलदार व २५ होमगार्ड सहभागी झाले होते. सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला.

पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघे ताब्यात.

Image
  पाचगावात बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघे ताब्यात. ६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई कोल्हापूर : पाचगाव येथे गणेशोत्सव आगमन मिरवणुकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला बंदुकीच्या धाकावर जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईत ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री ऋषिकेश भोसले याचा रणजित गवळी, चेतन गवळी व अरुण मोरे यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी वॅगनआर कारमधून येत भोसलेच्या डोक्याला बंदूक लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तक्रारीनंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून विनापरवाना सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतूस, वॅगनआर कार व दुचाकी असा एकूण ६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, प...

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले.कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई.

Image
  गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले.कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई.  ----------------------------- सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर  ------------------------------ सातारा जिल्हयात दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ या कालावधीत सार्वजनिक व घरगुती गणेश उत्सव होत असुन दिनांक ०५/०९/२०२५ रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. सातारा जिल्हयात एकुण ७,८०० सार्वजनिक गणेश मुर्तीची २,५४,४३९ घरगुती गणेश मुर्तीची स्थापना होणार आहे. सातारा जिल्हयात या वर्षी एकुण ५४२ गावात 'एक गाव एक गणपती' योजना राबविण्यात येत आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांचे अनुषंगाने दिनांक २७/०८/२०२५ ते दिनांक ०६/०९/२०२५ या कालावधीत ०१ पोलीस अधीक्षक, ०१ अपर पोलीस अधीक्षक यांचे सह ०८ पोलीस उपअधीक्षक व १४० अधिकारी, १८४० पोलीस अंमलदार, ०१ एस. आर.पी.एफ कंपनी, ३ आर.सी.पी.पथक, ०१ क्यूआरटी पथक, ११०० गृहरक्षक, इतके मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. जिल्हयामध्ये निघणाऱ्या मिरवणुका व इतर कार्यक्रमावर ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे सह ७ ड्रोन कैमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सातारा ज...

मेन राजाराम मध्ये आरती पाठांतर स्पर्धा उत्साहात साजरी.

Image
  मेन राजाराम मध्ये आरती पाठांतर स्पर्धा उत्साहात साजरी. --------------------------------------- बच्चे सावर्डे प्रतिनिधी  सुनिल पाटील  ---------------------------------------  कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी *आरती पाठांतर स्पर्धा* घेण्यात आल्या.    आरती म्हटल्याने भक्ती,श्रद्धेची अभिव्यक्ती होऊन आत्मिक शुद्धी प्राप्त होते.तसेच यामुळे मनाला शांतता व समाधान मिळते.सध्या सोशल मीडिया, मोबाईल मुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक आरत्या, अथर्वशीर्ष पठण पाठ नसून या संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आरत्या पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.     या स्पर्धेत कु.श्रृतिका जगन्नाथ कोंडा (प्रथम),कु.श्रद्धा पोपट कोळी (द्वितीय),कु.कवितादेवी सुखेन,कु.तारा इळीगेर(तृतीय),कु.मोक्षदा चोपडे (उत्तेजनार्थ) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्ष...

राजर्षी शाहू पतसंस्थेची सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात.

Image
  राजर्षी शाहू पतसंस्थेची सुवर्णमहोत्सवी सभा उत्साहात.  ------------------------------ जोतीराम कुंभार ------------------------------ मुरगूड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात १०७६ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल साध्य केली असून, चालू आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. ही संस्थेची अभिमानास्पद प्रगती असून, सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी कामगिरी आहे. मा.खासदार संजयदादा मंडलिक आणि युवानेते पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक मा.ॲड.विरेंद्रसिंह मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती.     संस्थेचे सभापती दतात्रय तुकाराम सोनाळकर मामा हे अध्यक्ष्यस्थानी होते. यावेळी सोनाळकर मामा म्हणाले अहवाल सालात संस्थेकडे, राखीव निधी व फंड ९कोटी ०६ लाख रु, ठेवी, ९३ कोटी १८ लाख, कर्ज वाटप ६४ कोटी ८६ लाख रु. गुंतवणूक ३८ कोटी ३८ लाख रु. खेळते भांडवल १०७ कोटी ९६ लाख रु, वार्षिक उलाढाल १०७६ कोटी ६४ लाख व नफा १ कोटी ५४ लाख १० हजार ६२५ रु. इतका झाला आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह शाखा मुरगूड, सावर्डे बु., सदाशिवनगर, बाचणी, कापशी (से), सिध्दनेर...

जयसिंगपूरातील सोनोग्राफी हॉस्पिटल्सवर प्रशासनाची कडक नजर!लिंग निवड तपासणी व अनियमिततेवर कारवाईची मोहिम.

Image
  जयसिंगपूरातील सोनोग्राफी हॉस्पिटल्सवर प्रशासनाची कडक नजर!लिंग निवड तपासणी व अनियमिततेवर कारवाईची मोहिम. ------------------------------- नामदेव भोसले ------------------------------- मुलींच्या जन्मदरात होत असलेली घसरण व वाढती स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मोहिमेत जयसिंगपूरातील सोनोग्राफी हॉस्पिटल्सही प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. शहरातील विविध हॉस्पिटल्स व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करताना काही ठिकाणी नियमभंग आढळल्याची माहिती समोर आली आहे. गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी रुग्णांचा एफ-फॉर्म नीट न भरलेला, तपासणीचे इत्यंभूत रेकॉर्ड अपूर्ण, तसेच यंत्रसामग्री वापरासंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. काही केंद्रांवर प्राथमिक कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. सोनोग्राफी हॉस्पिटल्सना सर्व नोंदी काटेकोरपणे ठेवणे, प्रत्येक गर्भवती महिलेसंबंधी फॉर्म्स पूर्ण करणे व तपासणी नोंदी किमान...