गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.
गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.
--------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
--------------------------------
गांधीनगर : काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सरिता नंदलाल पंजाबी या फिरावयास गेल्या असता पंजाबी यांना बुलेट ने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना जखमी अवस्थेत सिपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारा दरम्याण रात्री सव्वा तिनच्या सुमारास त्याचा मुत्यु झाला.
या आपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
काल दिनांक 06/08/2025 रोजी सिद्धार्थ राजू कसबे व इरफान मेहबूब नदाफ रा इंदिरा नगर झोपडपट्टी हे दोघे नविन बुलेट वरुन कोल्हापूर कडे निघाले होते
या सुमारास सरीता पंजाबी व व 49 रा कोयना कॉलनी नेहमीप्रमाणे जेवण आटपून फिरावयास गेल्या होत्या त्या गणेश टॉकीज जवळ आल्यावर त्यांना बुलेट ने पाठीमागून जोरदार धडक दिली धडक बसताच त्या जागीच कोसळल्या या अपघातातील जखमीना तेथे उपस्थित असलेल्या नागरीकानी उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना रात्री तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सनदी हे करत आहेत
Comments
Post a Comment