दत्तनगरमध्ये जुना वाद उफाळला; चौघांकडून तिघांवर जीवघेणा हल्ला
दत्तनगरमध्ये जुना वाद उफाळला; चौघांकडून तिघांवर जीवघेणा हल्ला.
-----------------------मिरज तालुका:- प्रतिनिधी राजू कदम.
------------------------
कुपवाड : दत्तनगर येथील शहा फाउंड्री परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून चौघांनी तिघांवर एडके व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी रवींद्र धोंडीराम माळी (वय ३४, रा. बामनोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास दत्तनगर शहा फाउंड्री कोपऱ्यावर ही घटना घडली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपी आनंद राजू यमगर, अजय शेळके, विकास लक्ष्मण जाधव आणि राहुल विठ्ठल चव्हाण (सर्व रा. बामनोली) यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र प्रमोद माने आणि अविनाश देशमुख यांना अडवून शिवीगाळ व दमदाटी केली.
यानंतर आरोपींनी हातातील एडके व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी स्वतः तसेच प्रमोद माने व अविनाश देशमुख जखमी झाले आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १०९(१), ११८(२), ३५२, ३५१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा क्रमांक ४८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. घटनेत वापरलेली ४ एडके व लाकडी दांडके पोलिसांनी जप्त केले आहेत.
प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे करीत आहेत. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

No comments: