विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती विकसित करावी : प्राध्यापक नांगरे डी. बी.
विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती विकसित करावी : प्राध्यापक नांगरे डी. बी.
साहित्य समाज जीवनाचे प्रतिबिंब असून साहित्याचं आकलन होणे गरजेचे आहे. साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक आहे. साहित्य मधून बहुविध पैलू मांडले जातात. साहित्याचा आस्वाद घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती अधिक विकसित करावी व साहित्याशी तादात्म्य होण्याकरिता या कल्पनाशक्तीचा उपयोग करावा. कथा, कादंबरी, नाटक व काव्य यांचे आकलन अधिक प्रगल्भतेने केल्याने साहित्य तून मिळणार आस्वाद एक वेगळा अनुभव देतो.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर व शिव - शाहू महाविद्यालय सरूड या Inches महाविद्यालयामधील असलेल्या सामांजस्य करारा अंतर्गत प्रा.डॉ. एन. डी पाटील महाविद्यालय येथे " हाऊ टू स्टडी अ लिटरेचर " या विषयावर प्रा. नांगरे डी. बी. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य पवार पी.जी. यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. डॉ. ढेरे डी. डी. यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.शेख एस.के. पाहुण्यांचा परिचय करून दिला व प्रास्ताविक सादर केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती धुमाळ एम. के. यांनी केले तर प्रा. कु. गावडे एम. एम. यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: