Posts

Showing posts from February, 2025

मुर्तीकारांच्या समस्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची ग्वाहि.

Image
  मुर्तीकारांच्या समस्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची ग्वाहि. ------------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------- *गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीवर बंदी आणल्याने राज्यातील मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.या गणेशमूर्ती पीओपीवरील बंदी उठवण्यात यावी* यासाठी  *श्री संत गोरोबाकाका कुंभार मुर्तिकार व विक्रेता संघटना इचलकरंजी* यांनी  कोल्हापुर शिवसेना जिल्हाप्रमुख *श्री रविंद्र माने साहेब* यांना *भेटून निवेदन* दिले. *अनेकांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी हा विषय* शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री *श्री एकनाथ शिंदे साहेब* यांची *भेट घेवुन कुंभार समाजावर पी ओ पी गणेश मुर्ती बंदी संदर्भात व मुर्तीकारांवर होत असलेल्या समस्याबाबतची मागणी सादर करण्याची ग्वाही* दिली. *इचलकरंजी शहरातील मुर्तिकारांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी मूर्तिकारांना आश्वासन दिले* याप्रसंगी *श्री संत गोरोबाकाका कुंभार मुर्तिकार व विक्रेता...

हिंगणगाव माळवाडी येथे टू व्हीलर ची एकमेकाला धडक दोघांचा मृत्यू .

Image
 हिंगणगाव माळवाडी येथे टू व्हीलर ची एकमेकाला धडक दोघांचा मृत्यू. ---------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ---------------------------- हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे माळवाडी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास मोटरसायकलची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये हिंगणगाव येथील  संस्कार प्रकाश खरात वय वर्ष १३ हा घटनास्थळी मुत्यु असून, दुसऱ्या गाडीवरील महिला मयत जाहिदा अलबक्ष मुल्ला वय 58 राहणार अब्दुल्लाट यांचा उपचारा  दरम्यान मृत्यू झाला आहे,            हिंगणगाव कडून कुंभोजकडे मयत जहिदा टू व्हिलरने आपल्या वस्ती समवेत निघाली होती, त्यांची अशक्तपणा यांच्या घरी बहीण असल्याने त्यांच्या भेटीसाठी ते आल्या होत्या, परिणामी माळभाग मधल्या गल्लीतून आडवी मुले आल्याने समोरा समोर धडक झाली , हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हिंगणगाव येथील मयत संस्कार खरात याचे शवविच्छेदन तारदाळ येथे करण्यात आले. तर मुल्ला यांचे शवविच्छेदन सांगली येथे करण्यात आले.        कुंभोंज /हिंगणगाव रोड वर दूपारी 3 च्या सुमारास दोन मोटर सायकल...

नागाव येथे करणी चा आघोरी प्रकार.

Image
  नागाव येथे करणी चा आघोरी प्रकार. -------------------------------- शिरोली प्रतिनिधी अमित खांडेकर  --------------------------------  नागाव येथील राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या स्मशान भूमी येथे करणी केलेले प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत आहेत  मयताचे दुःख पचवत कुटुंबीय मित्र परिवार कसा बसा स्मशान भूमी पर्यंत जातो पण  तिथे जाताच जे दृश्य दिसते ते अंगावर काटा आणणारे असते , लिंबू , मिरच्या , दोऱ्यात विविध रंगाच्या कपड्यात गुंडललेल्या बाहुल्या काळी कापडे हळद कुंकू गुलाल अर्धे नारळ असे अंगावर काटा आणणारे प्रकार समोर येतात ..  मयत व्यक्तीला तिथेच ठेऊन साफसफाई करायची तर भीती पोटी त्याला कोण हात लावत नाहीत अशी स्थिती असते अशा वेळी  परस्थिती अवघड होते  श्री नितीन लंबे शुभम परिट श्री अमित खांडेकर अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या धाडसाने असले प्रकार तेथून काढनेस मदत होते  स्थानिक  ग्रामपंचायत  प्रशासन , पोलिस ठाणे यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन. असले प्रकार थांबवावेत ही मांगणी आता नाग्रिकांच्यातून होत आहे

ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे येथे गुणवंतांचा सत्कार.

Image
ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे येथे गुणवंतांचा सत्कार. ----------------------------------------- पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील  -----------------------------------------                       महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणेत आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे मार्फत सत्कार करणेत आला.त्यामध्ये विशाल मारुती धनगर (महसूल सहाय्यक), हर्षद रामचंद्र सावंत (महसूल सहाय्यक), वासंती नागेश जाधव (महसूल सहाय्यक), संजीवनी श्रीकांत चौगुले (महसूल सहाय्यक), चित्रा राजेंद्र पाटील (कर सहाय्यक व महसूल सहाय्यक), शुभम चंद्रकांत खवरे (महसूल सहाय्यक) यांचा फेटा,शाल व श्रीफळ देऊन ग्रामपंचायतीचे मासिक सभेमध्ये सत्कार करणेत आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

दौलतवाडीत गवा रेडा विहिरीत पडल्याने खळबळ, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी!

Image
  दौलतवाडीत गवा रेडा विहिरीत पडल्याने खळबळ, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी! ------------------------------ मुरगूड/ जोतीराम कुंभार ------------------------------ दौलतवाडी येथे आज सकाळी एक थरारक घटना घडली. गावाजवळील राजू गणपती कानडे यांच्या खोल विहिरीत तब्बल ६०० किलो वजनाचा गवा रेडा पडला, यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. गव्याच्या गर्जनेसह लोकांची धावपळ सुरू झाली, आणि पाहता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. गव्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न सुरू केले, मात्र त्याच्या प्रचंड वजनामुळे हे काम कठीण बनले. अखेर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीने गवा रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे दौलतवाडीत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली असून, नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर कुतूहलाचा विषय बनला आहे. प्रशासनाने गर्दी हटवण्याचे आवाहन केले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे.   बचावकार्यासाठी कोल्हापूर रेस्कु टिमचे प्रदिप सुतार ,अमोल चव्हाण, अशुतोष सुर्यवंशी, वनरक्षक ...

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

Image
कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला. ---------------------------------------  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी . मंगेश तिखट ---------------------------------------  कोरपना येथे दिनांक 19 /2/2025  बुधवार   बस स्टॉप वर  स्वर्गीय  मनोज नामदेव केळ झळकर वय 32  गावं हेटी कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह सापडला पुढील तपास कोरपना पोलीस स्टेशन करत आहे

स्क्रॅप व्यावसायिकाने केली तीन कोटींची फसवणूक.

Image
  स्क्रॅप व्यावसायिकाने केली तीन कोटींची फसवणूक. -------------------------------- शिरोली प्रतिनिधी अमीत खांडेकर ----------------------------------  हि रक्कम आणखी ही जास्त असणेची शक्यता असून GST बिले नसलेले काही व्यापारी तक्रारी साठी पुढे येण्यास तयार नाहीत स्क्रॅप देण्याच्या अटीवर सुमारे तीन कोटींची रक्कम घेऊन फिरोज अहमद ऊर्फ बबलू खान रा.पुलाची शिरोली याने व्यापाऱ्यांना चुना लावून पलायन केले आहे. यामुळे शिरोली एमआयडीसीतील स्क्रॅप व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वी  खान आपल्या कुटुंबियांसमवेत घराला कुलूप लावून पसार झाला आहे. त्याने मोबाईल  बंद केल्याने  त्याच्याशी व्यवहार केलेल्या व्यावसायिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शनिवारी  थेट शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले आहे. पोलिसांनी गेली दोन दिवस फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच अर्जातील रकमेची पडताळणी सुरू केली आहे. याबाबत शनिवारी काही  व्यावसायिकांनी एकत्रित येऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे खान विरोधात तक्रार दिली आहे....

पुण्यावरून अमरावतीला .जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स समृद्धीवर अपघात एकाचा जागीच मृत्यू तर२0ते २५, प्रवासी गंभीर जखमी.

Image
  पुण्यावरून अमरावतीला .जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स समृद्धीवर अपघात एकाचा जागीच मृत्यू तर२0ते २५, प्रवासी गंभीर जखमी. ---------------------------------------- अमरावती जिल्हा प्रतिनिधी. पी एन देशमुख. ---------------------------------------- अमरावती. पुण्यावरून अमरावती जात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर पहाटे५.वाजताच्या सुमारास विषम अपघात झाला .चालकाला अचानक गिलके लागल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असून या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे .मिळालेल्या माहितीनुसार व्यक्तीचा एकूण आकडा20ते २५, असल्याचे समजते आणि अति गंभीर४ते५, जखमींना ताबडतोब अकोला येथे पाठवण्यात आले आहे घटनेची माहिती शेलुबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांना मिळताच, त्यांनी आमदार शाम खुळे यांना कळविले तात्काळ आमदार खोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना घटनास्थळाबद्दल माहिती देऊन मदतीची सूचना दिल्या मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच१४एच जी ६६६७, ही नागपूर मेन वरून जात होती यावेळी चैनल क्रमांक२१५, चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे, किंवात्रण ...

सांगली : भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर.

Image
  सांगली : भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर. ------------------------------------------- मिरज तालुका  प्रतिनिधी  राजू कदम ------------------------------------------- येळावी : विजापूर- गुहागर रोडला येळावी ता. तासगाव हद्दीत आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील (वय ३४, रा. नागराळे, ता. पलुस) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पलुस येथील बॉम्बे स्टील उद्योग समूहाचे मालक भगवान महादेव डाळे यांच्या मालकीची कार क्रमांक (MH १०- BM-११) घेऊन कामानिमित्त चालक धैर्यशील हे पलूसकडून सांगलीकडे निघाले होते. विजापूर- गुहागर मार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने एका शेडवर आदळुन कार शेतात पलटी झाली. यात चालक धैर्यशील जागीच ठार झाला. तर गाडीचे मोठे नुकसान झाले असून शेडचा चकाचूर झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कारने चक्काचूर झाल्याने चालकास बाहेर काढण्यासाठी पोलीस व नागरिकांना कटावणिचा वापर करावा लागत होता. घटनास्थळाचा पंचनामा झाला अस...

मुरगूड शहरात पोलिसांचा रूट मार्च.

Image
  मुरगूड शहरात पोलिसांचा रूट मार्च. -----------------------------------  मुरगूड प्रतिनिधी जोतीराम कुंभार -----------------------------------  आगामी शासकीय शिवजयंती व महाशिवरात्री सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड ,मुरगूड नाका- मुख्य बाजारपेठ ,कबरस्थान मशीद रोड मुरगूड अशा मार्गे कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आलेला आहे .सदर दंगल काबू योजना व रूट मार्च करिता मुरगुड पोलीस ठाणे कडील 2 अधिकारी , 20 पोलिस अमलदार व आरसीपी मुख्यालय कडील 1 अधिकारी, 39 अंमलदार,17 होमगार्ड हजर होते. तसेच मुरगूड ग्रामीण रुग्णालय कडील वैद्यकीय अधिकारी व ॲम्बुलन्स पथक, मुरगुड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशामक दल पथक उपलब्ध ठेवण्यात आलेले होते.सदरची रंगीत तालीम घेऊन सर्व अधिकारी ,पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना रंगीत तालीम चा आशय व उद्देश समजावून सांगितला आहे.

अवैध धंद्याबाबत पोलीस पाटलांनी तत्काळ माहिती द्यावी-पोलीस महानिरीक्षक.

Image
  अवैध धंद्याबाबत पोलीस पाटलांनी तत्काळ माहिती द्यावी-पोलीस महानिरीक्षक. ---------------------------------- बाजार भोगाव प्रतिनिधी ----------------------------------         .  पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत गावकामगार पोलिस पाटील यांनी  पोलिस ठाण्यात   तात्काळ माहिती द्यावी.  अशा सुचना  कोडोली येथील कार्यक्रमात बोलताना केल्या आहेत . त्यामुळे पोलिस पाटील अॕक्शन मोडवर येतील अशी अपेक्षा व्यक्त  केली जात आहे .  हप्ता घेवून  धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून पोलिस पाटलांवर दबाव आणून त्याचा आवाज दाबला जातो. अशी चर्चा आहे . त्यामुळे वरिष्ठांनी  अवैध धंद्यांबाबत माहिती देणाऱ्या  पोलिस पाटलांच्या  पाठीशी गंभीरपणे ऊभे  राहले तर त्यांचे मनोधर्य वाढेल अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांमुळे पोलीस पाटलांचे मनोधर्य वाढले आहे.

पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी केले रिक्षा चालकाचे अभिनंदन रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.

Image
  पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी केले रिक्षा चालकाचे अभिनंदन रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा. ----------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ----------------------------------- कोल्हपूर- शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दी मध्ये इशिता अनुज गुप्ता रा.CPR हॉस्पिटल येथे दि.05/02/2025 रोजी CPR हॉस्पिटल येथून कावळा नाका येथे रिक्षातून जात असता लॅपटॉप असलेली बॅग रिक्षातच विसरली होती. सदर वेळी रिक्षा चालक बाळकृष्ण राहू गजगेश्वर रा. शिंगणापूर यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी ती बॅग शाहुपूरी पोलीस ठाणेत आणून दिली. इशिता अनुज गुप्ता या पोलीस ठाणेस तक्रार देण्यात आले असता त्यांना सदर रिक्षा चालक यांना पोलीस ठाण्यास बोलावून ती त्यांच्या हस्ते इशिता गुप्ता यांना परत केली.  यावेळी पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेच्या वतीने रिक्षा चालकाचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक ही केले.

मुरगूडमधे वृद्धाश्रमाच्या खोट्या नावाने देणगी मागणाऱ्या दांपत्याचा शिवभक्तांकडून पर्दाफाश.

Image
  मुरगूडमधे वृद्धाश्रमाच्या खोट्या नावाने देणगी मागणाऱ्या दांपत्याचा शिवभक्तांकडून  पर्दाफाश. ----------------------------- मुरगूड प्रतिनिधी जोतीराम कुंभार ----------------------------- मुरगुडच्या सरपिराजीराव रोडवर सकाळच्या वेळी एक गाडी स्पीकर वरून वृद्धाश्रमाला मदत करा असे आवाहन करत फिरत होते यामध्ये एक महिला हातामध्ये कन्नड अक्षरे असलेले फाईल घेऊन घरोघरी जुने कपडे धान्य मागत होते त्याचा संशय आल्यामुळे शिवभक्त सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार यांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे असलेल्या परवाना, संस्थेची कागदपत्रे यांची चौकशी केली यावेळी त्यांनी उडवाउडविची उत्तर दिले तसेच आम्हाला मराठी भाषा येत नाही त्यामुळे तुम्ही कन्नड मध्ये बोला अशी धमकी देण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्या साथीदाराला फोन लावून त्याच्याशी बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा हा डाव शिवभक्तांनी उलटवून लावला पोलिसांची भीती दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याकडे कोणताही परवाना असल्याचे तसेच आम्ही फक्त कर्नाटक भागातच मागू शकतो असे सांगितले त्यावर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी कर्नाटकामध्ये परत सांगितले पुन्हा असे प्रकार के...

मुरगुड मध्ये छावा चित्रपटाचे जोरदार स्वागत.

Image
  मुरगुड मध्ये  छावा चित्रपटाचे  जोरदार स्वागत. ------------------------------- मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ------------------------------- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे मुरगूड येथे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण जीवन सांगणारा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे सर्वच ठिकाणी या चित्रपटाचे जोरदार स्वागत केले जात आहे सध्या आपल्या मुलांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजावा म्हणून बॉलिवूडमध्ये करण्यात आलेल्या या प्रयत्नाचे कौतुक संकेत भोसले यांनी बोलताना केले पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट पाहण्यासाठी पुढचे सगळे शो देखील असेच फुल होतील असा अंदाज सिनेमागृहाचे मालक खाशाबा भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, प्रकाश पारिशवाड, निखिल पाटील, अमृत पोतदार,सागर हळदकर, प्रशांत कांबळे ,त...

हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी-1 दिलीपकुमार काळे यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे त्यांची मुख्यालय अथवा अन्यत्र बदली करणेबाबत निवेदन.

Image
  हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी-1 दिलीपकुमार काळे यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे त्यांची मुख्यालय अथवा अन्यत्र बदली करणेबाबत निवेदन. ----------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ----------------------------- हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयामध्ये श्री दिलीपकुमार काळे हे दिनांक 17/10/2022 इ. रोजी रुजु झाले आहेत. काळे हे हजर झाले पासुन त्यांची कारकीर्द अनेक कारणाने वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्याबाबत नोंदणीसाठी येणा-या शेकडो पक्षकारांच्या तक्रारी आहेत. कार्यालयामध्ये दररोज 50 हून अधिक दस्तांची नोदणी होत असते पण सकाळी वेळेत कामकाज चालु करण्याऐवजी कार्यालयामध्ये विनाकारण कामकाजात संबंध नसणा-या व्यक्तिंना घेवून बसतात त्याच बरोबर दस्त लेखनिक, मुद्रांक विक्रेते व नागरिकांना केबीनचे दोन्हीही दरवाजे आतुन बंद करुन सर्वाना ताटळत बसवतात दोन मोबाईल बघत अनावश्यक टाईमपास करतात त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयीन नियमाप्रमाणे 10.00 वा. चालु होण्याऐवजी 11.30 ते 12.30 नंतर दस्त नोदणीस सुरुवात होते. त्यामुळे दिवसभर दस्त नोंदणीस विलंब होत असल्याने 10.00 वा. आलेल्या पक्षकारांना...

आईच्या नावाने मेडिकल सुरू करणारा सुदर्शन आदर्शवत: आमदार नायकवडी.

Image
  आईच्या नावाने  मेडिकल सुरू करणारा  सुदर्शन आदर्शवत: आमदार नायकवडी. -----------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ----------------------------------- मिरज: आईच्या नावाने लक्ष्मी जनसेवा जनरिक मेडिकल स्टोअर सुरू करणारा मुलगा सुदर्शन केमकर याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे मत आमदार इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केले .या  उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर होते . येथील जुबली कन्या शाळेचे उपमुख्याध्यापक निवृत्त मुख्याध्यापक डी बी केमकर व म.द.करमकर विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका लक्ष्मी केमकर यांचा मुलगा सुदर्शन याने फार्मसी चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अशा टॉकीज जवळ आपल्या आईच्या नावाने लक्ष्मी जनसेवा जनरिक मेडिकल स्टोअर या नावाने दुकान सुरू केले .या दुकानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व रोटरी क्लबचे सचिव डॉ.रियाज मुजावर व नूतन आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते झाले. डॉ.दत्तात्रेय केमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ शामल केमकर यांनी आभार मानले. डॉ.शुभ...

सेनापती कापशी येथे नातवानेच केला आजीचा घात

Image
  सेनापती कापशी येथे नातवानेच केला आजीचा घात. ------------------------------------ मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ------------------------------------ सेनापती कापशी येथे पैसे उसने न दिल्यामुळे एका नातवानेच आजीचा खून केला अशी बातमी समोर येत आहे.. बातमी अशी की आरोपी गणेश राजाराम चौगुले हा विक्रम नगर इचलकरंजी मध्ये राहत होता आरोपीने काढलेले कर्ज फेडण्यासाठी आरोपीने विक्रमनगर, इचलकरंजी  येथील राहते घर विकले होते पण तरीही अजून काही रक्कम देणे बाकी होते.  सेनापती कापशी येथे राहणाऱ्या सगुना तुकाराम जाधव या आपल्या आजीच्या बँक खात्यामध्ये दोन लाख रुपयांची रक्कम आहे ही गोष्ट आरोपी जाणून होता यामुळेच आरोपी वारंवार आपल्या आजीकडे एक लाख रुपये उसने मागत होता पण आजीला देखील आपल्या नातवाविषयी संपूर्ण माहिती असल्यामुळे आजी उसने पैसे देण्यासाठी नकार देत होती बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आरोपी गणेश चौगुले त्याच्या दोन मित्रांसह कापशी येथील आपल्या आजीच्या घरी पुन्हा उसने पैसे मागण्यासाठी आला होता पण आजीने  दरवेळी प्रमाणे नकार दिल्यामुळे आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आजीचा गळ...

महावितरणचा कोल्हापूर व सांगलीतील वीजचोरांना दणका विशेष मोहिमेत ७६ वीजचोरांवर कारवाई.

Image
  महावितरणचा कोल्हापूर व सांगलीतील वीजचोरांना दणका विशेष मोहिमेत ७६ वीजचोरांवर कारवाई. ----------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी ----------------------------  सांगली, दि. १३ फेब्रुवारी २०२५:* कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत ७६ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ६० वीजचोऱ्यांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा – २००३च्या  कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तर कलम १२६ प्रमाणे अनधिकृत वीजवापराचे १६ प्रकार आढळून आले आहेत. वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु असते.  त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. ८) वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ४८१० तर सांगली जिल्ह्यात २४३२ वीज ग्राहकांची ...

संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर पुरस्काराचे मानकरी: मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.

Image
  संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर पुरस्काराचे मानकरी: मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. -------------------------------- कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे --------------------------------  कोल्हापूर:  संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ''एसजीयु आयकॉन'' हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी कला आणि समाजसेवा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठी सिनेमा कलाकार मकरंद अनासपुरे, क्रीडा क्षेत्रातून स्वप्निल कुसळे,  वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अशोक पुरोहित, प्रसिद्ध ईएनटी सर्जन,  शैक्षणिक क्षेत्रात डॉ. अनिल पाटील रयत शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्रात महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण दि.२८ फेब्रुवारी रोजी हिंदी फिल्म स्टार व गायक ‘आयुष्यमान खुराना’ आणि संजय घोडावत यांच्...

पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी.

Image
  पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी. ---------------------------------------- मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम ---------------------------------------- जिल्हाधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन. सांगली : विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी,  सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले. यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपींवर पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न आणि संगनमताने कट, कार्यालयातील महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात. ते व्हावेत.आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा व तपास उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा.  शस्त्रे, कपडे, अंगावरील जखमा, डॉकटर अहवाल, सीसीटिव्ही फुटेज या सर्वांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात य...

उचगावात मोटरसायकल स्वारास मारहाण दहा जणांवर गुन्हा दाखल.चौघांना अटक.

Image
  उचगावात मोटरसायकल स्वारास मारहाण दहा जणांवर गुन्हा दाखल.चौघांना अटक. ------------------------------------ कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------------ गांधीनगर:- उचगाव ता. करवीर येथील निगडे बिल्डिंग सर्विस रोडवर मोटर सायकल धडकल्याच्या राग मनात धरून पाच ते सहा जणांनी फायटर आणि दगडाने मारहाण केल्याने संतोष नेताजी माने (वय 27,रा. बाबा नगर उचगाव ता. करवीर) हा युवक गंभीर जखमी झाला. यावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात चौघासह अज्ञात पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंद झाला .  यावरून नौमान रहिम शेख (वय 19), शाहरुख मुराद मोमीन, (वय30) दोघे,रा. मनेर मळा उचगाव), स्वरूप उर्फ स्वरप्या रमेश सावंत (वय19 रा . लक्ष्मी कॉलनी टेंबलाई नगर कोल्हापूर), आस्तिक आप्पासो म्हातुगडे (वय 22 रा. तामगाव ता करवीर), अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद जखमी संतोष माने यांने गांधीनगर पोलिसात दिली.  याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी संतोष माने हा उचगाव निगडे बिल्डिंगच्या सर्विस रोडने मोटरसायकलने घरी जात होता. त्य...

मयूर फाटा येथे 12 चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला :- रोडवरती कोल्ड्रिंक्सच्या बाटल्याच बाटल्या.

Image
  मयूर फाटा येथे 12 चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला :-  रोडवरती कोल्ड्रिंक्सच्या  बाटल्याच बाटल्या. ---------------------------  शिरोली प्रतिनिधी अमीत खांडेकर  ---------------------------  पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी 3 च्या सुमारास शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाटा येथील उड्डाणपुलावर 12 चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला.  सविस्तर माहिती अशी की, नवनाथ खंडू खोतमाळी रा.शिरूर,जिल्हा पुणे  हा चालक  ट्रक क्रं.एम एच १६ सी ए ८२५० घेऊन आज सकाळी 6 वाजता सुपा, अहमदनगर येथून कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या भरून कोल्हापूर येथील मुडशिंगी येथे येण्यासाठी निघाला होता. दुपारी 3 च्या सुमारास हा ट्रक शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाटा येथे आला असता चालकाला डुलकी लागल्याने आणि अचानक दु चाकी आडवी आल्याने ड्रायव्हर चलबिचल झाला.आणि ट्रक थेट महामार्गावरून  सेवा रस्त्यावर कोसळला. यावेळी सेवा रस्त्यावरून जाणारा दुचाकी स्वार थोडक्यात बचावला.नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.हा ट्रक अहमदनगर येथील रोकडे ट्रान्सपोर्ट चा असल्याचे समजते.या अपघ...

भाकणूककार श्री बाबुराव कृष्णा डोणे महाराज यांचे निधन.

Image
  भाकणूककार श्री बाबुराव कृष्णा डोणे महाराज यांचे निधन. ------------------------------------------ मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ------------------------------------------   श्री क्षेत्र हालसिद्धनाथ आप्पाचीवाडी  श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थान आदमापूर चे मुख्य मानकरी आणि भाकणूककार श्री बाबुराव कृष्णा डोणे वाघापूरे महाराज ( वय 69) यांचे दुःखद निधन ते श्री सद्गुरु बाळूमामा देवस्थान आदमापूर चे मुख्य मानकरी आणि भाकणूककार  श्रीकृष्णात डोणे महाराज यांचे ते वडील होत त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तिन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंत्यसंस्कार वेळी  आप्पाचीवाडी आणि बाळूमामा आदमापूर येथील सर्व मानकरी पंचक्रोशी येथील सर्व भक्त यांनी मोठी गर्दी केली होती

राधानगरी तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत.

Image
  राधानगरी तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत. ----------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे  ---------------------------- काल दिनांक 31 जानेवारी रोजी राधानगरी तालुक्यातील मांगोली आणि ठिकपुर्ली येथे पाण्यात बुडून दोघाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.  मांगोली येथील दत्तात्रय ईश्वरा पाटील हे येथील आपल्या नावली नावाच्या शेतामधील ऊस पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले असता विहिरीवरील मोटार चालू करत असताना पाय घसरून विहिरीत पडले. ही घटना आसपासच्या शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पाटील यांना उपचाराकरिता सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर ठिकपुर्ली येथील वैशाली सर्जेराव कांबळे ही चाळीस वर्षीय महिला सकाळी साडेदहाच्या सुमारास कॅनॉल मध्ये कपडे धुण्याकरिता गेली असता पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा दुदैवी मुत्यू झाल्याची दुसरी घटना घडली  त्यांनाही उपचार करता सोळांकुर रुग्णालयात नेल असता  डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर दोन्ही घटनांची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार...