पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावच्या ५ जणांची भारतीय सैन्य दलात निवड...
पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावच्या ५ जणांची भारतीय सैन्य दलात निवड...
************************
पन्हाळा प्रतिनिधी- आशिष पाटील
*************************
जिद्द, चिकाटी व सातत्याने सर्व काही शक्य करता येते हे करून दाखवलं आहे पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावच्या ५ मित्रांनी...
पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गाव तसं लहानच पण हे गाव विविध सहकारी संस्था, ( पतसंस्था,शिक्षण संस्था) उत्तम शेती, भाजीपाला यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. पण गावात शासकीय नोकर वर्ग फार कमी. याची कुठे तरी खंत इथल्या तरूणांना होती. यासाठी काहीही करून गावातील तरुण आर्मी पोलीस अशा सरकारी नोकरीत भरती झाले पाहिजेत असा मनाशी निर्धार तरूणांनी केला होता.पण सर्वांनाच बाहेर अकॅडमी मध्ये जावून प्रशिक्षण घेण परवडणारं नव्हतं आणि गावात सराव करावा तर सरावासाठी मैदान नव्हतं, त्यामुळं गावातील तरुणांनी पुढं येत लोकवर्गणीतून गावात मैदान व अभ्यासिका तयार केली .आणि विषेश म्हणजे यातील कोणीही कोणतेही बाहेर क्लास वगैरे न लावता गावातल्या याच मैदानात सराव व अभ्यास करून हे यश मिळवलं आणि एकाच वेळी 5 जिवलग मित्रांनी यश मिळवून कुठं तरी शाशकीय नोकरीत मागं असणाऱ्या गावाचं नाव पंचक्रोशीतच नाही तर तालुक्यात करून दाखवल्याच्या भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहेत ... गावच्या वतीनं या सर्वांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
- यामध्ये शंतनू संदीप खोत, रोहीत सरदार चौगले ,आदित्य अनिल कळेकर यांची आर्मीध्ये जीडी या पदावर तर प्रणव प्रकाश खापणे व यश दिपक खोत यांची टेक्निकल या पदावर निवड झाली...

No comments: